Pune Video

Pune Video : पुण्यात कुऱ्हाड गँग सक्रीय ! कुऱ्हाडीने बेदम मारहाण करत आरोपींनी ग्राहकांना लुटलं

678 0

पुणे : पुण्यामध्ये (Pune Video) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. काल वडगाव शेरी येथील घटना ताजी असताना आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये नांदेड फाटा या ठिकाणी असणाऱ्या दारूच्या दुकानात चक्क तीन जणांनी कुऱ्हाडीचा धाक दाखवत दुकान बंद करून दारू पिणाऱ्या ग्राहकाला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत ग्राहकांकडून रोख रक्कम आणि किमती ऐवज लुटला. ही संपूर्ण चोरीची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हवेली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

काय घडले नेमके?
रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. दारूच्या दुकानात नेहमीप्रमाणे ग्राहक दारू पित होते. अचानक तिघेजण आतमध्ये घुसले आणि त्यांनी दमदाटी करत कुऱ्हाडीचा धाक दाखवत ग्राहकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने हॉटेलमधील ट्रे उचलत ग्राहकांना डोक्यात आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आधी कोयता गँग आणि आता कुऱ्हाड गँग सक्रीय झालीय का? असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांना पडला आहे. या सगळ्या प्रकारामुळं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : किल्ला बनवा स्पर्धेतील विजेत्यांसाठी गडकोट किल्ल्यांची मोहिम चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

Thane News : खळबळजनक ! ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळाजवळ बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल

Maratha Reservation : जरांगे पाटलांचा मुंबई मोर्चाचा मार्ग ठरला

Pune News : पुण्यात आईच्या डोळ्यादेखत डंपरने लेकराला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

Madhya Pradesh Accident : बस आणि डंपरचा भीषण अपघात,12 जणांचा मृत्यू

Microsoft : मायक्रोसॉफ्टचा एक निर्णय अन् कोरोडो लॅपटॉप होणार बाद!

Pune News : पुण्यात कोयता गॅंगचा पुन्हा हैदोस; महिला पोलिसांसमोरच कोयता व तलवारीने माजवली दहशत

Satara Firing : सातारा हादरलं ! साताऱ्यात कमानी हौद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार

Accident News : साईबाबांचे दर्शन राहिलं अधुरं! साईभक्तांच्या गाडीचा भीषण अपघात

Pune Blast : पुण्यातील विमाननगर परिसरात 10 गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!