Pune News

Pune Crime News : पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी अपडेट; आता 2 तरुणी ATS च्या रडारवर

825 0

पुणे : पुण्यात (Pune Crime News) काही दिवसांपूर्वी 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील तिसरा आरोपी कातिल दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर दस्तगीरला काल अटक करण्यात आली. आता या प्रकरणात (Pune Crime News) नवे वळण समोर आले आहे. या प्रकरणामध्ये आणखी 2 तरुणींचा समावेश असल्याचे समजत आहे. या दोन तरुणी ATSच्या रडारवर आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
दहशतवाद्यांना राहण्याच्या सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही कातिल दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर दस्तगीरवर होती. 2 दहशतवाद्यांच्या अटकेनंतर ‘अल सफा’च्या रतलाम मॅाड्युलचा पर्दाफाश झाला. 2 दहशतवाद्यांच्या अटकेनंतर तिसरा आरोपी सुद्धा सापडला आहे. आणखी 6 आरोपी अल सफाच्या रतलाम मॅाड्युलमध्ये सक्रिय असल्याच एटीएसच्या तपासात समोर आले आहे. यामध्ये 2 तरुणींचादेखील समावेश आहे. जामिया मिलियाची विद्यार्थिनी असलेली अलिफिया नामक अल सफाची सक्रिय महिला ही एटीएसच्या रडारवर आहे.

गेल्या आठवड्यात पुण्यात दोन दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून तपासात धक्कादायक अशी माहिती समोर आली होती. दोन्ही दहशतवाद्यांनी सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात स्फोटकांची चाचणी केल्याची माहिती एटीएसला समजली होती.महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय 23) आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी (वय 24) अशी त्या दहशतवाद्यांची नावे होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!