Vaibhav Shinde

Pune Suicide News : धक्कादायक ! सुसाईड नोट मध्ये भावाकडे शेवटची इच्छा व्यक्त करीत पुण्यात पोलिसाची आत्महत्या

8630 0

पुणे : पो. अंमलदार श्री. वैभव शिंदे, (रा. लोहगाव,खेसे काॅलनी पुणे) यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरी आत्महत्या (Pune Suicide News) केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.  विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील कारवाई सूरू आहे.

पोलीस शिपाई वैभव दिलीप शिंदे, ब नंबर 10008, नेमणूक मोटर परिवहन विभाग पुणे चालक रा. गुरुद्वारा कॉलनी, लोहेगाव, पुणे यांनी दिनांक 7/7/2023 रोजी पहाटे 4.00 वाजणाचा सुमारास राहते घराचे टेरेस वर चिंचेच्या झाडाच्या फांदीला टॉवेल ने गळफास घेऊन आतमहत्या केलेली आहे. तें गुरुद्वारा कॉलनी येथे त्यांची पत्नी कांचन व 4 वर्षांचा मुलगा व भाऊ विजय असे भाड्याने राहत होते.

वैभव शिंदे यांना प्रथम त्यांची पत्नी कांचन यांनी पाहिलेले.शिंदे यांच्या शर्टच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये मजकूर असं कि, कांचन मला माफ कर, भाऊ मम्मी मला माफ करा, विजय माझी शेवटची इच्छा पूर्ण कर कांचन सोबत लग्न कर sorry. शिंदे यांना मूळव्याधीचा त्रास होता. दोन महिना पूर्वी त्याचे ऑपरेशन झालेले आहे. मागील 3 तें 4 वर्षापासून तें psi पदासाठी परीक्षेचा स्टडी करीत होते.

Share This News
error: Content is protected !!