पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन दिवसापूर्वी एका स्कूलबस चालकाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
गुरुवारी रात्री 11च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आता आरोपींचा शोध घेणं सुरू असल्याची माहिती मिळत आहे.