Pune Crime

Pune Crime : पुण्यात बाप्पाच्या विसर्जनाला गालबोट; दोन गटांत झाला तुफान राडा

2399 0

पुणे : राज्यात कालपासून गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे. मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना दिसत आहेत. पुण्यात (Pune Crime) अद्यापही गणपतींच्या मिरवणुका सुरु आहेत. अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण असताना, पुण्यातल्या सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तळजाई येथील दोन मंडळात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. हा सगळा प्रकार सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिंदे शाळेजवळ दुपारी दोनच्या सुमारास घडला. या दोन गटाच्या भांडणामुळे महिला आणि लहान मुलं, मुली यांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. हा धक्कादायक प्रकार घडला तेव्हा त्या ठिकाणी सहकारनगर पोलीस स्टेशनमधील एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता.

काय घडले नेमके?
शेंडी टोळी आणि सूर्या टोळी या दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली आहे. या दोन टोळीचे दोन गणेश मंडळ पुण्यातल्या तळजाई वसतिगृह परिसरात आहे. त्यामुळे कोणत्याही कारणावरून नेहमीच वाद आणि मारामारी या दोन गटांमध्ये होत असते. कालच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान देखील या दोन गटांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. सूर्या गणेश मित्रमंडळ आरती करण्यासाठी शिंदे शाळेच्या विसर्जन हौदावर आले असता त्यादरम्यान कोणत्यातरी कारणावरून इंद्रधनुष्य मंडळाचे शेंडी टोळीने त्याठिकाणी येऊन वाद घातला. याचा जाब विचारला असताना दोन्ही टोळींमध्ये हाणामारी झाली.

ही हाणामारी एवढी भयानक होती कि, हातात मिळेल त्या वस्तूने एकमेकांच्या विरोधात वार प्रतिवार सुरू होते. त्यानंतर एकमेकांना रस्त्यावर पडलेल्या दगडं फेकून मारत होते. या हाणामारीमध्ये गणेश विसर्जनासाठी आलेल्या महिला आणि लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर प्रश्न उपस्थित होत आहे की, घटनास्थळी एकही पोलीस कर्मचारी हजर का नव्हता? त्या ठिकाणी कुणालाही कार्यरत करण्यात का आलं नव्हतं? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!