Pune Police

Pune Police : ब्लू डार्ट कंपनीच्या गाडीतून महागडे मोबाईल चोरणाऱ्या आरोपींना युनिट -2 पोलिसांनी केले जेरबंद

2303 0

पुणे : दिनांक 10/08/2023 रोजी रात्री सहकारनगर पोलीस स्टेशन गु र. क्र.193/2023 भादवि कलम 379 अन्वय ब्लू डार्ट एक्सप्रेस कुरिअर कंपनीचे मालवाहतुकी दरम्यान APPLE कंपनीचे I-PHONE, I-PAD व डिजिटल SMART WATCH असा 3,90, 445/-रु किमतीचा इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल चोरी झालेबाबत गुन्हा दाखल होताच दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन युनिट-2 प्रभारी श्री नंदकुमार बिडवई यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली युनिट 2 कडील सपोनि वैशाली भोसले, पोलीस अंमलदार गजानन सोनुने,अमोल सरडे पुष्पेन्द्र चव्हाण, साधना ताम्हणे, संजय जाधव,उत्तम तारू,विनोद चव्हाण विजय पवार अशी टीम तयार करून तात्काळ आरोपींचा शोध घेणेबाबत आदेश दिले.

त्याअनुषंगाने सपोनि वैशाली भोसले व वरील स्टाफ असे आरोपींचा युनिट 2 हद्दीत शोध घेत असताना, युनिट- 2 कडील पो. अंमलदार *पुष्पेन्द्र चव्हाण व अमोल सरडे यांना बातमी मिळाली की दोन संशयित इसम पद्मावती ट्रॅव्हल्स पार्किंग येथे चोरीचे महागडे फोन विक्रीसाठी आले असून ते ग्राहक शोधत आहे. अशी बातमी मिळताच सदर बातमीच्या अनुषंगाने युनिट -2 कडील वरील टीम यांनी पद्मावती ट्रॅव्हल्स पार्किंग जवळ सापळा रचून शिताफीने इसम नामे 1) अभिजीत अरुण जाधव (वय 26 वर्ष रा. मुकादमवाडी, कुरकुंभ, दौंड, पुणे) 2) अक्षय संभाजी निंबाळकर, (वय 23 वर्ष, रा.मु.पो. मळद, ता. दौंड जि. पुणे) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून किंमत 3,90,445/- रु चे 05 नग APPLE कंपनीचे I-PHONE, 01 APPLE कंपनीचा I-PAD, 03 नग डिजिटल SMART WATCH असा मुद्देमाल मिळून आला असून त्यांनी दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याने, त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी सरकारनगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास सहकारनगर पोलीस स्टेशनकडील अधिकारी करीत आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी, माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री. सुनील तांबे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई , यांचे मार्गदर्शनाखाली API वैशाली भोसले, विशाल मोहिते, PSI राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे, पोलीस अंमलदार गजानन सोनुने, अमोल सरडे, पुष्पेन्द्र चव्हाण, साधना ताम्हाणे, उज्वल मोकाशी, उत्तम तारू , संजय जाधव, निखिल जाधव, विनोद चव्हाण,विजय पवार, मोसिन शेख,नामदेव रेणुसे शंकर नेवसे, राहुल राजपुरे, नागनाथ राख या पथकाने केलेली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!