pune police

Pune Police : मृत्यूनंतरही देशसेवा! ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी अवयवदानाचा घेतला निर्णय

5438 0

पुणे : मरावे परी किर्ती रुपे उरावे, हे वाक्य पुण्यातील एका (Pune Police) पोलिसानं सिद्ध केलं आहे. अपघात (Pune Police) झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एक मोठा निर्णय घेत कुटुंबियांनी त्यांचे अवयव दान करत माणुसकीचा आदर्श ठेवला आहे. मृत पोलिसांच्या कुटुंबीयांच्या कार्याचं सर्वस्तरावरुन कौतुक केलं जात आहे.

काय घडले नेमके?
राजेश कौशल्य असे अवयव दान करणाऱ्या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. राजेश कौशल्य हे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत होते. 2 ऑगस्ट रोजी मध्यरात्री मोशीतील स्पाईन रोड या ठिकाणी काम आटपून घरी जात असताना त्यांचा अपघात झाला. अपघात झाल्यावर कोणीही मदतीला आलं नाही. तडफडत असताना अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे जखमी झाल्यानंतर अर्धा तास कोणतीही मदत न मिळाल्याने त्यांचा उचारादरम्यान मृत्यू झाला.

राजेश कौशल्ये हे त्यांच्या कुटुंबीयांचे कर्तेधर्ते होते. पोलीस (Pune Police) खात्यातदेखील त्यांचं काम चोख होतं. त्यांच्या अशा प्रकारे जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. कुटुंबातील महत्वाचा व्यक्ती आणि कर्तबगार व्यक्ती गेल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. जर त्यांना वेळेत मदत मिळाली असती तर त्यांचा जीव वाचू शकला असता.

किडनी, त्वचा, डोळे आणि ह्रदय या अवयवांचं दान केलं आहे. पुण्यातील रुबी हॉलमध्ये अवयव दान करण्यात आले. त्यांचं ह्रदय पुण्यातील 46 वर्षीय भारतीय सैन्याला दान करण्यात आले आहे. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस मध्ये प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पडली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!