Pune News

Pune News : कामावरुन काढल्याच्या रागातून पुण्यात मॅनेजरची हत्या

54679 0

पुणे : शिरूर तालुक्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे.यामध्ये (Pune News) कामावरुन काढल्याच्या रागातून एका कामगाराने आपल्या मॅनेजरची हत्या केली आहे. ही हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील वडनेर या ठिकाणी ही हत्येची घटना घडली आहे. आत्ताउल्ला उर्फ मोईन शाबीर खान (वय 24 वर्ष, रा. चेंबूर, मुंबई) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर शाहिद रफीक बागवान असे आरोपीचे नाव आहे.

काय घडले नेमके?
वडनेर – फाकटे रोडवर वडनेर येथे जाकीर गफार सय्यद यांचे फार्म हाऊस आहे. त्यांचाच नातेवाईक असलेला आत्ताऊल्ला खान हा तेथे वास्तव्यास राहून फार्म हाऊसवरील सर्व कामे पहात होता. आरोपी शहीद बागवान हा त्यांच्याकडे कामासाठी आला होता. त्यामुळे तिथेच राहत होता. मात्र त्याच्या कामात दिरंगाई दिसल्याने त्याला खान यांनी कामावरून काढून टाकले. यामुळे आरोपीच्या मनात राग होता.

यानंतर आरोपीने याच रागाच्या भरात बागवान याने रहात असलेल्या खोलीत खान याच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला. खून केल्यानंतर त्याने फार्म हाऊसमधील सर्व खोल्यांना आतून कड्या लावून तो पळून गेला. मात्र तिथे काम करणाऱ्या इतर कामगारांना संशय आल्याने त्यांनी कड्या उघडून पाहिले तर खून केल्याचे उघडकीस आले. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!