Arrest

माजी नगरसेवकाकडे खंडणी मागणाऱ्या तोतया पोलिसाला सापळा लावून अटक

3855 0

पुणे – वरिष्ठ पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकाकडे २० लाखांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेने अटक केली आहे.

अमित जगन्नाथ कांबळे (रा. नवी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याने काही दिवसांपूर्वी पुणे कॅन्टोन्मेंटच्या माजी नगरसेवकाच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. मी मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त आहे अशी बतावणी करत तुमच्या विरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करतो. , असे सांगितले. या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात माजी नगरसेवकाने फिर्याद दिली होती.

या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून तपास करण्यात येत होता. कांबळे ससून रुग्णालयाच्या परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी मोहसीन शेख आणि पुष्पेंद्र चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. कांबळे याने यापूर्वी राजकीय नेते, डॉक्टर पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून वीसहून अधिक खंडणीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक निरीक्षक विशाल मोहिते, संजय जाधव, मोहसीन शेख, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, उत्तम तारू, विनोद चव्हाण, विजय पवार, नागनाथ राख आदींनी ही कारवाई केली.

Share This News
error: Content is protected !!