Pimpari Crime

Pimpari Crime : पिंपरीत रंगला फिल्मी थरार ! पैशांवरुन झालेल्या वादातून सराईत गुंडाचा भररस्त्यात खून

24433 0

पिंपरी : पिंपरी चिंचवड (Pimpari Crime) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीतील (Pimpari Crime) सांगवीमध्ये एका सराईत गुंडाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी संध्याकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. सागर शिंदे असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे. तर योगेश जगताप आणि हृषिकेश खरात अशी आरोपींची नावे आहेत.

काय घडले नेमके?
सागर शिंदे हा 2013 साली हत्येच्या गुन्हेत अटकेत होता. तर 2018 साली तो तुरुंगात बाहेर आला, त्यानंतर तो पेपर आणि दूध विक्री व्यवसाय करायचा. तर योगेश आणि हृषिकेश हे सलून आणि रिक्षा चालवतात. प्रत्येक महिन्याला दीड लाखांच्या भिशीचं वाटप होतं, यावेळी नंबर कोणाला द्यायचा यावरुन त्यांची चर्चा सुरु होती. तिघेही चतु:शृंगी मंदिर परिसरातून काळेवाडीकडे निघाले होते. हृषिकेश गाडी चालवत होता, सागर पुढे डावीकडे तर योगेश मागे बसला होता. यावेळी भिशीच्या वाटपावरुन वाद विकोपाला गेला.

यानंतर चालत्या गाडीतच सागरने बंदूक बाहेर काढली अन् धमकवायला सुरुवात केली. त्यावेळी योगेशने बंदूक हिसकावली अन् पाठीमागून सागरवर गोळी झाडली. त्यानंतर सागर गाडीचे दार उघडून धावू लागला मग योगेशने दुसरी गोळी झाडली. यात सागरचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरला तिथेच सोडून योगेश आणि हृषिकेश पसार झाले. त्यानंतर दोन तासांतच गुंडा विरोधी पथकाने या दोघांना बेड्या ठोकल्या. सांगवी परिसरात असणाऱ्या भारत इलेक्ट्रिक कंपनीसमोर हा संपूर्ण प्रकार घडला. फिल्मी स्टाईलने घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. गोळीबार झाल्यानंतर त्याच वाहनाने काही गाड्यांना धडकही दिली. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा मान्य केला आहे.

Share This News
error: Content is protected !!