पुणे : सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण (Pune News) पाहायला मिळत आहे. मात्र या उत्सवाला गालबोट लावणारी घटना मावळ तालुक्यातून समोर आली आहे. नव वर्षांच्या स्वागतासाठी अनेकजण नदी काठी, धरणाकाठी फिरायला जातात. मात्र थर्टी फर्स्ट आणि नव वर्षाच्या स्वागताची पार्टी करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
काय घडले नेमके?
मयूर भाटी (30, रा. शिक्षक सोसायटी वराळे) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. वराळे गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदी पात्रात बुडून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. मयूर हा मित्रांसोबत मावळ तालुक्यातील वराळे येथील इंद्रायणी नदी काठी आले होते. यादरम्यान पोहण्यासाठी मयूर पाण्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी घेतली. यानंतर मृतदेह काढण्यासाठी वन्य जीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्यांनी काही वेळात मृतदेह बाहेर काढला. नव वर्षांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे मयूरच्या कुटुंबियांवर नववर्षाच्या सुरुवातीलाच दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Fixed Deposit Interest Rates : ‘या’ 5 बँकांनी ग्राहकांना दिलं न्यू ईयर गिफ्ट
Nitin Kareer : नितीन करीर राज्याचे नवे मुख्य सचिव
Women Fight Video : दिल्ली मेट्रोमध्ये रंगली ‘दंगल’ तुफान हाणामारीचा VIDEO व्हायरल
Immunity Boost : आजारांपासून राहायचं असेल दूर, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खा ‘या’ 7 गोष्टी
Accident News : अहमदनगरमध्ये ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात; 3 जण ठार
Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! बाईकच्या अपघातातून वाचले अन्…
Sport News : 2023 मध्ये क्रीडा विश्वात घडल्या ‘या’ महत्वाच्या घडामोडी
Movie Released In 2023 : ‘या’ 15 चित्रपटांनी 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडत केला कल्ला
Veteran Artists Pass Away In 2023 : 2023 मध्ये ‘या’ दिग्ग्ज कलाकारांनी घेतला जगाचा निरोप
Top Political Events 2023 : 2023 मध्ये घडल्या ‘या’ महत्वाच्या राजकीय घडामोडी