पुणे : पुण्यात (Pune News) पावसाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मात्र पावसाच्या सुरुवातिलाच धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. लोखंडी कंपाऊंडला एका तरुणाचा हात लागल्याने त्याला शॉक बसून त्याचा जागेवर मृत्यू झाला. पुण्यातील कोंढवा (Pune News) परिसरात ही घटना घडली असून शनिवार असल्याने शाळा बंद होती अन्यथा पुण्यात मोठी दुर्घटना घडली असती.
Train Accident : डबे रुळावरून घसरून दोन मालगाड्यांचा भीषण अपघात; 14 रेल्वे रद्द
त्यामुळे महावितरणच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अजयकुमार शर्मा असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून त्याला दोन मुले आणि पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोंढवा परिसरात अजयकुमार हा कामानिमित्त तिथून जात होता. त्याला अचानकपणे त्या ताराना धक्का लागला. त्याला जोरात शॉक बसला. यात त्याचा मृत्यू झाला.
Satara News : ‘खूप केलं माणसांसाठी आता बस्स’… व्हाट्सअॅप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या
मात्र याबाबत (Pune News) महावितरण विभाग कुठलीही जबाबदारी घेण्यास तयार नसून पोलिस देखील तक्रार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे माझ्या भावाला न्याय द्यावा अशी मागणी अजयकुमार शर्मा यांच्या भावाने केली आहे.