Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर काचांच्या ट्रकचा भीषण अपघात; वाहतूक विस्कळीत

819 0

मुंबई : राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा एकदा भीषण अपघात (Mumbai Pune Expressway Accident) झाला आहे. या एक्सप्रेस वेवरील (Mumbai Pune Expressway Accident) बोरघाट पोलीस चौकीजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर काहीजण जखमी झाले आहेत. यामध्ये काचेच्या ट्रकचा भीषण अपघात झाल्याने एक्स्प्रेस वेवर काचा पसरल्या आहेत. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातामुळे पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!