Pune News

Pune News : खळबळजनक ! पिझ्झा डिलिव्हर करण्यासाठी उशीर झाल्याने ग्राहकाची डिलिव्हरी बॉयला मारहाण

527 0

पुणे : आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांच्या राहणीमानात बदल होताना दिसत आहे. या धावपळीच्या जगात (Pune News) लोक वेळ वाचवण्यासाठी ऑनलाईन जेवण मागवत असतात. पुण्यामध्ये याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिझ्झा डिलिव्हर करण्यासाठी उशीर झाल्याने चिडलेल्या ग्राहकाने डिलिव्हरी बॉयला मारहाण करत हवेत गोळीबार केला आहे. वाघोली येथील वाघेश्वर मंदिराजवळ ही घटना घडली आहे. चेतन वसंत पडवळ असे डिलिव्हरी बॉयला मारण करत फायरिंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
रोहित राजकुमार हुलसुरे हे वाघोली परिसरात असलेल्या एका पिझ्झा सेंटरमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करतात. मंगळवारी रात्री उशिरा आरोपी चेतन पडवळ याने ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केला होता. पिझ्झा डिलिव्हरीची ऑर्डर डिलिव्हरी बॉय रोहित हुलसुरेला पोहोचवण्यास उशीर झाल्याने दोघामध्ये मोठा वाद झाला. यानंतर आरोपीने रोहितला मारहाण केली.

रोहितला मारहाण झाल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी पिझ्झा डिलिव्हरी सेंटरमधील देवेंद्र, राहुल आणि इतर त्याचे मित्र गेले असता आरोपीने या सर्वांना मारहाण केली. यानंतर आरोपीने त्याच्या कारमधील एक पिस्टल काढून हवेत फायरिंगदेखील केले. या प्रकरणी आरोपी चेतन पडवळ याच्यावर लोणीकंद पोलिसात जीवितास धोका निर्माण होईल असा प्रकार केल्या प्रकरणी कलम 308, 323 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!