Pune News

Pune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! सराईत गुन्हेगार जयवंत उर्फ जयड्या गायकवाडकडून 6 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

736 0

पुणे : दिनांक 20/08/2023 रोजी स्वारगेट व सहकार नगर पोलीस ठाणे हद्दीत युनिट 02 कडील अधिकारी व अंमलदार गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार गजानन सोनुने व संजय जाधव यांना एक गुप्त माहिती मिळाली. यानंतर त्यांनी या गुप्त माहितीच्या आधारे घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार नामे जयवंत उर्फ जयड्या गायकवाड हा मीनाताई ठाकरे वसाहत येथे पांढऱ्या रंगाची आपाची गाडीसह उभा असून त्याच्याजवळ घरफोडी चोरीतिल सोनं विक्री करण्यासाठी आलेला आहे अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेतले.

यावेळी पोलिसांनी आरोपीकडून 107 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, एक दुचाकी गाडी, दागिने वजन करण्याचे इलेक्ट्रॉनिक मशीन व घरफोडी चोरी करण्यासाठी वापरलेले हत्यार असा सर्व एकूण 6,30,750/- रु चा मुद्देमाल जप्त केला. यानंतर पोलिसांनी खात्री केली असता समर्थ पोलीस स्टेशन गु.र.क्र.186/2023 भादवी 380, 454, 457 प्रमाणे गुन्हा दाखल असून खात्री करून पुढील कारवाईसाठी त्याला समर्थ पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले.

Share This News
error: Content is protected !!