Pune Drug Case

Pune Drug Case : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिस दलातील 2 पोलिसांना अटक

545 0

पुणे : अमली पदार्थ तस्कर (Pune Drug Case) ललित पाटील प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी पुणे शहर पोलिस दलातील 2 पोलिस कर्मचार्‍यांना गुन्हे शाखेच्या युनिट-2 च्या पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. ललित पाटीलने ज्या दिवशी ससून रूग्णालयातून पलायन केले त्या दिवशी ससून रूग्णालयात बंदोबस्तावर असणार्‍या पोलिस नाईक नाथाराम काळे आणि अमित जाधव या मुख्यालयातील कोर्ट कंपनीच्या पोलिसांना गुन्हे शाखेच्या युनिट-2 ने अटक केली आहे.कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
पुण्यातील ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील (Lalit Patil) हा आरोपी 2 ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेला 15 दिवसांचा कालावधी होऊन देखील आरोपी ललित पाटीलचा शोध लागत नव्हता. अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले. मुंबई पोलिसांनी त्याला तामिळनाडूील चेन्नई येथून अटक केली होती.यानंतर पोलिसांनी ललितचा भाऊ भूषण पाटीललादेखील पोलिसांनी अटक केली. तसेच दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपी महिलांनी ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत केली होती. प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही महिलांची नावे आहेत.

आरोपी ललित पाटील हा नाशिक जिल्ह्यातील शिंदे गावात 2021 सालापासून ड्रग्जचं उत्पादन करून त्याची तस्करी करत होता. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि देशातील अनेक राज्यांमध्ये ललित पाटील ड्रग्ज सप्लाय करत होता. ड्रग्ज माफिया ललित पाटील हा मूळ नाशिक जिल्ह्यातला आहे. एवढेच नाहीतर अनेक बड्या नेत्यांशी देखील ललित पाटील याचे संबंध असल्याचे समोर आले आहे. आता त्याला अटक करण्यात आल्याने काही बड्या नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!