Pune Crime News

Pune Crime News : गुडलक चौकात श्वानाला धडक देऊन ठार मारणाऱ्या लेम्बोर्गिनी कार चालकाला अटक

27739 0

पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune Crime News) गुडलक चौकात एका लेम्बोर्गिनी कारने दिलेल्या धडकेत एका कुत्र्याला आपला जीव गमवावा लागला होता. पुणे (Pune Crime News) शहरातील प्रसिद्ध अशा फर्ग्युसन रस्त्यावर ही संतापजनक घटना घडली होती. धडक इतकी जोरात होती की त्या कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला होता.

सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला. ही संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात एक निळ्या रंगाची Lamborghini कार आणि तिच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नीना नरेश राय (वय-57) या महिलेने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीला कारचालकाला अटक केली आहे. तसेच लेम्बोर्गिनी कारदेखील जप्त करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!