पुणे : पुणे (Pune Crime News) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पुण्यातील महात्मा फुले संग्रहालयात अधिकारी महिलेचा विनयभंग झाला आहे. वरिष्ठ व्यवस्थापकानेच हे कृत्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
महात्मा फुले वस्तु संग्रहालयामध्ये काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याकडे ”कीस” मागत तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना 13 डिसेंबर रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास घडली. राजीव विनायक विळेकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 70 वर्षीय विनायक हे डेक्कन येथील प्रभात रोड परिसरात राहतात.
या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी भादवि 354 अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात 39 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पिडीत महिला महात्मा फुले संग्रहालयात अधिकारी आहे. आरोपी हा वरिष्ठ व्यवस्थापक आहे. विळेकर हे या महिलेच्या टेबलजवळ गेले. त्यांना जवळ ओढून त्यांना ” एक कीस दे” असे म्हणाले. महिलेने त्यांना असे करण्यास नकार दिला. त्यानंतर देखील त्याने हाच धोशा सुरू ठेवला. त्यानंतर ”तुला प्रॉब्लेम असेल तर आपण दरवाजा लावून घेऊ” असे म्हणत बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune PMC Water Supply News : गुरूवारी अर्ध्या पुणे शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद
Salim Kutta : भाजप आमदार नितेश राणे यांनी आरोप केलेला सलीम कुत्ता नेमका आहे तरी कोण?
Pune Viral Video : वारकरी पोशाख ,पाठीवर बॅग पुण्यातील ‘त्या’ तरुणांचा वेगळाच स्वॅग; Video व्हायरल
Sudhakar Badgujar : …तर मी आत्महत्या करेन; बडगुजर यांनी दिला इशारा
Ulhasnagar Accident : उल्हासनगरमध्ये कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात; 3 जण ठार
Priya Singh : इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर प्रिया सिंहच्या प्रकरणात मोठी अपडेट ! 3 जणांना अटक
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री मदतीसाठी धावले ! जखमी रुग्णाला घेऊन स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये
Actress Tanuja Hospitalised : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल
Junnar Accident News : कल्याण नगर महामार्गावर तिहेरी अपघात; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू
Accident News : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू