Suicide

Pune Crime News : पुण्यात छेडछाडीला वैतागून एका 19 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

565 0

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी (Pune Crime News) समोर आली आहे. यामध्ये छेडछाडीला वैतागून एका 19 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. पुण्यातील कात्रजच्या प्रसिद्ध महाविद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याकडून छेडछाड होत असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. हॉस्टेलमधील काही मुलीही तिला त्रास देत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेणुका बालाजी साळुंके (वय 19) असं मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि हॉस्टेलमध्येच राहणारी मुस्कान सिद्धू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र घडलेल्या या प्रकारामुळं हॉस्टेल व महाविद्यालयात तणावाचे वातावरण आहे.

Share This News
error: Content is protected !!