PUNE CRIME : पोलिसांनी तुडवले तरीही कोयता गँगचा धुमाकूळ सुरूचं ! आझम कॅम्पस परिसरातील हॉटेल बाहेर राडा; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

918 0

पुणे : पुण्यात कोयता गँगची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी सिंहगड रोडवर कोयता गँगने राडा घातला होता. यानंतर पोलिसांनी यातील एकाला चांगलंच तुडवलं देखील होतं. याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पुणेकरांना काहीसं हायसं वाटतच होतं. तर पुन्हा एकदा आता या कोयता गॅंगने दहशत माजवत आझम कॅम्पस परिसरातील एका हॉटेलची तोडफोड केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकतो की, पाच ते सहा जणांनी हॉटेलमध्ये घुसून कोयत्याने तोडफोड केली आहे. यावेळी परिसरातील नागरिक घाबरून सैरावैरा पळू लागले होते. या प्रकरणातील काही आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याचे देखील आहेत.

Share This News
error: Content is protected !!