Yerwada Jail

Pune Crime : पुण्यातील येरवडा जेलमध्ये कैद्याची निर्घृणपणे हत्या

938 0

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात (Pune Crime) मागच्या काही दिवसांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा झालेल्या या हत्येने खळबळ उडाली आहे. कात्री आणि दरवाजाच्या बिजागिरीच्या साहाय्याने ही हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी 4 कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हत्येच्या घटनेने येरवडा कारागृह हादरलं आहे. महेश महादेव चंदनशिवे असं हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे. पूर्व वैमनस्यातून 4 कैद्यांनी महेशची हत्या केल्याचे समजत आहे.चारही आरोपींच्या विरोधात पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैचीने आणि दरवाज्याच्या बिजागिरीने मानेवर वार करत आरोपींकडून महेशची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Video : पुण्यात कुऱ्हाड गँग सक्रीय ! कुऱ्हाडीने बेदम मारहाण करत आरोपींनी ग्राहकांना लुटलं

Pune News : किल्ला बनवा स्पर्धेतील विजेत्यांसाठी गडकोट किल्ल्यांची मोहिम चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

Thane News : खळबळजनक ! ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळाजवळ बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल

Maratha Reservation : जरांगे पाटलांचा मुंबई मोर्चाचा मार्ग ठरला

Pune News : पुण्यात आईच्या डोळ्यादेखत डंपरने लेकराला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

Madhya Pradesh Accident : बस आणि डंपरचा भीषण अपघात,12 जणांचा मृत्यू

Microsoft : मायक्रोसॉफ्टचा एक निर्णय अन् कोरोडो लॅपटॉप होणार बाद!

Pune News : पुण्यात कोयता गॅंगचा पुन्हा हैदोस; महिला पोलिसांसमोरच कोयता व तलवारीने माजवली दहशत

Satara Firing : सातारा हादरलं ! साताऱ्यात कमानी हौद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार

Accident News : साईबाबांचे दर्शन राहिलं अधुरं! साईभक्तांच्या गाडीचा भीषण अपघात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!