Pune Acsident

पुण्यातील भोरमध्ये भरधाव पिकअप टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात; 7 मजूर जखमी

1948 0

पुणे : पुण्याच्या भोरमधील नेकलेस पॉईंटजवळ भरधाव पिकअप टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोमधील 7 मजूर जखमी झाले आहेत. हा टेम्पो मजूर आणि बांधकाम साहित्य घेऊन पुण्याहून भोरच्या दिशेने येत असताना टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातात जखमी झालेले सर्व मजूर परप्रांतीय आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे काही काळ त्या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती. राजगड पोलीसांकडून या अपघाताचा अधिक तपास सुरु आहे.

नेमका कसा घडला अपघात?
अपघातग्रस्त पिकअप टेम्पो मजूर आणि बांधकाम साहित्य घेऊन पुण्याहून भोरच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. आणि हा टेम्पो पुण्याच्या भोरमधीलपॉईंटजवळ पलटी झाला. त्यावेळी पिकअपमध्ये 7 मजूर होते. ते या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हे सर्व जखमी मजूर परप्रांतीय आहेत. राजगड पोलीस स्टेशनचे कर्मचारी या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत. पिकअपमध्ये अधिक साहित्य असल्यामुळे अपघात झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!