Pune Accident

Pune Accident : पुणे हादरलं ! सिग्नल सुटला अन् आई- वडिलांच्या डोळ्यादेखत जुळ्या मुलींनी सोडला जीव

5436 0

पुणे : पुण्यात अपघाताचे (Pune Accident) प्रमाण खूप वाढले आहे. अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन जुळ्या बहिणींना आपला जीव गमवावा लागला आहे. विश्रांतीवाडीतील मुकुंदराव आंबेडकर चौकात सिग्नल सुटल्यानंतर दुचाकीला टँकरची धडक बसून झालेल्या अपघातात दोन जुळ्या मुलींचा मृत्यू झाला तर त्यांचे आईवडील जखमी झाले आहेत.

काय घडले नेमके?
सतीश कुमार झा (40) हे आपल्या 3 वर्षांच्या जुळ्या मुली आणि पत्नीसह दुचाकीवरून जात असताना विश्रांतीवाडी चौकात ट्रॅफिक सिग्नलजवळ थांबले होते. दिवा हिरवा होताच मागून येणाऱ्या पेट्रोल टँकरने मोटारसायकलला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती कि, यामध्ये श्रद्धा आणि साक्षी या जुळ्या बहिणींना आपला जीव गमवावा लागला.

अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी धावपळ सुरु केली. चारही जणांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी गडबड सुरु होती. मात्र यादरम्यान श्रद्धा आणि साक्षी या जुळ्या बहिणींनी आपला जीव सोडला. या अपघातात आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर वडिलांना किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपी पेट्रोल टँकर चालकाला अटक केली आहे.

Share This News
error: Content is protected !!