Pune Accident

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात ! 5 शेतमजूरांना भरधाव कारने चिरडलं

462 0

पुणे : पुण्यामध्ये (Pune Accident) काल रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात मध्य प्रदेशातून आलेल्या मजुरांना एका भरधाव कारने चिरडले आहे. या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यामध्ये भरधाव कारने रस्त्याने चालणाऱ्या 5 मजुरांना चिरडले आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

काय घडले नेमके?
कल्याण-नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील दत्त मंदिराजवळ असलेल्या कठेश्वरी पुलाजवळ हा भीषण अपघात घडला. कल्याणहून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने मध्य प्रदेशातील पाच मजुरांना चिरडले. त्यातील दोन मजूरांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच इतर दोन गंभीर जखमींना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे.

जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत झालेल्या तिघांची नावे आहेत. तर दिनेश जाधव, विक्रम तारोले अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला आहे. शेतातील कामे संपवून हे मजूर पायी रस्त्याने जात होते. यादरम्यान कल्याण-नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीत दत्त मंदिरा जवळील कठेश्वरी पुलाजवळ गाडी क्र. एम एच 12 व्ही क्यू 8909 या कारने त्यांना चिरडले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!