Pune News

Pune News : रक्तबंबाळ होईपर्यंत शेतकऱ्याला मारहाण; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तुफान राडा

898 0

पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात (Pune News) तुफान हाणामारी झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे दालन असलेल्या पाचव्या मजल्यावर, एका शेतकऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे.

काय घडले नेमके?
मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव राजेंद्र चव्हाण असे आहे. विरोधी पक्षकाराच्या वकिलाने दमदाटी करून मारहाण केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. तर दुसरीकडे स्वसंरक्षणासाठी मारहाण केल्याचा दावा वकिलांकडून करण्यात आला आहे. हा वाद सोडवण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली. जमिनीचे कागदपत्राबाबत कामासाठी शेतकरी कार्यालयात आला असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आता पुणे पोलीस (Pune News) या प्रकरणी काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Share This News
error: Content is protected !!