Kalamb Jail

Kolhapur News : मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीची निर्घृणपणे हत्या

385 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून (Kolhapur News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृहात कैद्याचा खून करण्यात आला आहे. दोन गटात झालेल्या मारहाणीतुन हि हत्या झाली आहे. या हत्येमुळे पुन्हा एकदा कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहे. ड्रेनेजच्या झाकणाने पाच कैद्यांनी मारहाण करून कैद्याचा खून केला होता. कैद्यांच्या मारहाणीत खून झालेला कैदी हा मुंबईमधील 1993 च्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी आहे. मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता असं मृत कैद्याचे नाव आहे.

काय घडले नेमके?
आज सकाळी साडेसात वाजण्याचे सुमारास कारागृहातील हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला असता निर्घृण खून करण्यात आला. न्यायालयीन बंदी असलेल्या आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेशा पाटील, दीपक नेताजी खोत,संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, सौरभ विकास सिद्ध या पाच जणांनी ड्रेनेज वरील लोखंडी झाकणाने मुन्नाला मारहाण केली होती. या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कारागृह प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता ! हवामान विभागाकडून ‘या’ 23 जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Pune Crime News : पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राइव्ह ! नवले पुलावर मद्यधुंद डंपर चालकाने महिलेला उडवलं

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!