Accident Video

Accident Video : धक्कादायक ! पुण्यात अज्ञात वाहनाने गर्भवती महिलेला उडवलं; CCTV फुटेज आलं समोर

590 5

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पुण्याच्या निघोजेमध्ये अज्ञात वाहनाने (Accident Video) गर्भवती महिलेला पाठीमागून जोरात धडक दिल्याने महिला जखमी झाली आहे. हि संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. श्रद्धा सागर येळवंडे अस जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. श्रद्धा येळवंडे या गर्भवती असून त्यांचं बाळ सुखरूप असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

काय घडले नेमके?
शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास देहू- निघोजे रस्त्यावर बालिंगवस्ती या ठिकाणी जखमी श्रद्धा येळवंडे या रस्त्याच्या कडेने डाव्या बाजूने चालत जात होत्या. त्यावेळी भरधाव वेगातील स्विफ्ट गाडी नंबर (एम.एच 14 एच. के.0529 ) ने पाठीमागून जोरात धडक दिली. यात श्रद्धा येळवंडे जखमी झाल्या असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.

या अपघातानंतर कारचालक फरार झाला आहे. याप्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे पोलीस या चालकाचा शोध घेत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Monsoon Update : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे; हवामान विभागाने वर्तवला ‘हा’ अंदाज

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!