Amruta Fadnavis

Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे CA ला पडलं महागात; पोलिसांनी केली मोठी कारवाई

384 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. अशाच एका प्रकरणी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून एका सीएला ताब्यात घेतलं आहे. अतिष ओमप्रकाश काबरा असे अटक करण्यात आलेल्या CAचे नाव आहे.

Joe Lindner Pass Away : बॉडीबिल्डर जो लिंडनरचं वयाच्या 30 व्या वर्षी निधन

काय आहे नेमके प्रकरण?
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना मागच्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. यादरम्यान अमृता फडणवीस यांच्या विरोधात एका ट्विटर अकाऊंटवरून एक आक्षेपार्ह कमेंट करण्यात आली होती. ही घटना लक्षात येताच शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी याची माहिती पोलिसांनी दिली.

Shreyanka Patil : श्रेयंका पाटीलने रचला इतिहास, WCPL मध्ये खेळणारी ठरली पहिली भारतीय

यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरु करून या प्रकरणी (Amruta Fadnavis) एका सीएला ताब्यात घेतले. अतिष ओमप्रकाश काबरा असे त्या CAचे नाव आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!