पिंपरी चिंचवड हादरले ! मंगळवारी हवेत गोळीबार करणारे तीन आरोपी पिंपरी पोलिसांच्या जाळ्यात; असे शोधले आरोपी

509 0

पिंपरी चिंचवड : मंगळवारी सायंकाळी चिंचवड येथील पत्रा शेड तसेच पिंपरी येथील भाटनगर परिसरात तीन आरोपींनी हवेत गोळीबार केला. यावेळी आठ बुलेट फायर करण्यात आल्या असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केल आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवडमध्ये दहशतीचे वातावरण होते.

या घटनेमध्ये दापोडी येथील सराईत गुन्हेगार शहरुख शेख हा त्याच्या दोन साथीदारांसह रिक्षातून चिंचवड येथील पत्रा शेड येथे आला. त्यानंतर त्याने हवेत गोळीबार केला. त्यानंतर भाटनगर येथे येऊन पुन्हा दोन गोळ्या झाडल्या, तसेच परिसरातील सीसीटीव्ही बंद करण्यासाठी एका व्यक्तीला पिस्तुलाचा देखील धाक दाखवला होता. तर कोणीही व्हिडिओ शूट करू नये यासाठी मोबाईल देखील त्याने हिसकावून घेतले होते.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या आरोपींचा सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे शोध सुरू होता. या प्रकरणातील प्रमुख आरोपी शाहरुख शहानवाज शेख, फारूक शाहनवाज शेख आणि सोहेल शेख या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होता. त्यामुळे शहरांमध्ये कडेकोट बंदोबस्त असताना देखील अशा घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!