पिंपरी चिंचवड : सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ED चे छापे ; 400 कोटींहून अधिकचा घोटाळा
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ईडीने आज सकाळपासून छापे टाकले आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप करून तब्बल 400 कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं.
या प्रकरणी मुलंदानी यांच्यासह पाच जणांना अटकही करण्यात आली होती. दरम्यान, काही महिन्यांआधी अमर मुलचंदानी जामिनावर बाहेर आले आहेत. आता पुन्हा त्यांच्यावर ईडीने छापा टाकल्याने एकाच खळबळ उडालीय आहे.
