Pavitra Jayaram : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; तर इतर 4 जण गंभीर जखमी

1295 0

हैद्राबाद : कन्नड मालिकाविश्वातून एक दुख:द बातमी समोर आली असून प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री पवित्रा जयराम हिचा भीषण कार अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे. हैदराबादच्या मेहबूब नगरजवळ हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत असून तिच्या कारला एका बसला धडक बसली आहे. ही धडक इतकी भीषण होती की अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला आहे.

नेमके काय घडले?
मिळालेल्या माहिती नुसार, कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील हनाकेरे येथून परत येत असताना हा भीषण अपघात झाला असून अपघातामध्ये पवित्रा जयरामचा चुलत भाऊ, बहीण अपेक्षा, गाडीचालक श्रीकांत आणि अभिनेता चंद्रकांत हे गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार डिव्हायडरला धडकली आणि त्यानंतर हैदराबादहून वानपर्थीकडे येणारी बस ही कारच्या उजव्या बाजूला जाऊन धडकली असे समोर आले आहे. मात्र, या अपघातात पवित्राचा जागीच मृत्यू झाला आहे.

कोण आहे पवित्रा?
पवित्रा जयराम ही कन्नड मालिकाविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने कन्नड व्यतिरिक्त अनेक भाषांच्या मालिकेत काम केले आहे. पण कन्नड मालिकाविश्वात तिची सर्वाधिक लोकप्रियता होती. तेलुगु मालिकांमधील आपल्या दमदार अभिनयाने तिचा एक मोठा चाहतावर्ग देखील आहे. तिच्या मृत्यूमुले इंडस्ट्रीत तिच्या सहकलाकारांना आणि चाहत्यांना धक्का बसला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Loksabha : माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Ahmednagar News : नगरमध्ये मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा; व्हिडिओ शेअर करत भाजपनं पैसे वाटल्याचा लंकेनी केला आरोप

Pune Loksabha : राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क

Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क 

Weather Update : राज्यात हायअलर्ट जारी ! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने पाऊस आणि गारपिटीचा दिला इशारा

Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन

Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!