Crime

एक महिन्याच्या बाळाला रेल्वेच्या शौचालयात टाकून आई-वडील फरार

204 0

एक महिन्याच्या बाळाला रेल्वेच्या शौचालयात टाकून आई-वडील फरार

बाळाला जन्म देणे ही प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात आनंदाची गोष्ट असते. मात्र स्वतःच्या एक महिन्याच्या बाळाला रेल्वेच्या शौचालयात टाकून दिल्याची धक्कादायक घटना मुंबईत समोर आली आहे. मुंबई देवगिरी एक्सप्रेस मधील शौचालयात ही एक- दीड महिन्यांची मुलगी आढळून आली. या बाळाला शौचालयात पाहून प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. तर ही बातमी समजतात जनसामान्यात संतापाचे वातावरण दिसत आहे.

नांदेडकडून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसने प्रवासी प्रवास करत असताना औरंगाबाद स्थानक सोडल्यानंतर प्रवाशांना शौचालयातून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. त्यावेळी प्रवाशांनी पाहिले असता शौचालयात ओढणीवर एक ते दीड महिन्यांची मुलगी ठेवलेली दिसली. प्रवाशांनी तात्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर मनमाड रेल्वे स्थानकावर या बाळाला उतरवण्यात आले. तसेच नाशिक येथे असलेल्या बालसुधारगृहात या बाळाला ठेवण्यात आले आहे. तर लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात पालकांविरोधात बाळाला सोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून बाळाच्या आई-वडिलांचा शोध सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!