Parbhani Crime

Parbhani Crime : राजीनामा दे म्हणत उपसरपंच महिलेसह कुटुंबाला मारहाण; मुलाचा मृत्यू

4731 0

परभणी : परभणीमधील (Parbhani Crime) सेलुतील ब्राह्मणगाव या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली. यामध्ये (Parbhani Crime) गावातील महिलेला उपसरपंच पदाचा राजीनामा दे म्हणत सरपंच आणि त्यांच्या कुटुंबियांकडून मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत या उपसरपंच महिलेच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सरपंचांसह इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

काय घडले नेमके?
परभणीच्या (Parbhani Crime) सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव इथल्या उपसरपंच शशिकला कांबळे यांच्या घरी 5 ऑगस्ट रोजी गावच्या सरपंच साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे,महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे हे सर्व जण आले आणि तुम्ही उपसरपंच पदाचा राजीनामा द्या असे म्हणत त्यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद वाढल्याने त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. सरपंच साधना डोईफोडे यांच्या गटाकडून कांबळे यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत उपसरपंच शशिकला कांबळे यांचा मुलगा निखिल कांबळे याला रॉडने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या निखिल यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

सरपंचासह पाच जणांना अटक
या प्रकरणी शशिकला कांबळे यांनी सेलू पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरुन सरपंच साधना डोईफोडे,केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे यांच्यावर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्वांना अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हाळ हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!