Parbhani News

Parbhani News : पतीला भीती दाखवायला गेली आणि स्वतःचाच जीव गमावून बसली

484 0

परभणी : परभणीमध्ये (Parbhani News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पतीला भीती दाखवण्यासाठी गळफास घेण्याचा प्रयत्न करणे एका महिलेला महागात पडले आहे. यामध्ये पतीला भीती दाखवण्याच्या नादात पत्नीलाच गळफास बसला आहे. मृत महिला आणि आणि तिचा पती बामणी गौरी सणानिमित्त गावी आले होते. दरम्यान, पती गावातील गणपती पाहण्यासाठी घराबाहेर जात असल्याने पत्नीने विरोध केला. तसेच, पतीला भीती दाखविण्यासाठी गणपतीकडे जाऊ नका, अन्यथा मी फाशी घेईल असे म्हणाली. यानंतर पतीने हसत हसत घे फाशी म्हणत घरातून निघू लागला. त्यामुळे, पतीला भीती दाखवण्यासाठी तिने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यातच खरोखरच गळफास बसला आणि त्यात तिचा मृत्यू झाला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कावी या ठिकाणी हि दुर्दैवी घटना घडली आहे. सायली लक्ष्मण काठमोरे (वय 19 वर्षे, रा. कावी, ता. जिंतूर) असे मृत महिलेचे नाव आहे. लक्ष्मण काठमोरे आणि त्यांची पत्नी सायली हे दोघेही गौरी सणानिमित्त गावाकडे आले होते. दरम्यान, घरात सायंकाळी महालक्ष्मीच्या आगमनाची तयारी सुरू होती. याचवेळी लक्ष्मण हे गणपतीकडे जातो असे म्हणून घरातून बाहेर पडण्यासाठी निघाले. त्यावर, सायलीने तुम्ही गणपतीकडे जाऊ नका असे म्हटले. तसेच तुम्ही जर गेलात तर मी फाशी घेईल, असे म्हणाली. सायलीचं हे म्हणणं लक्ष्मण यांनी मनावर न घेता हसत हसत घे फाशी असे म्हणत घराबाहेर पडू लागले. त्यामुळे सायलीने पतीस भीती दाखवण्यासाठी घरामध्येच महालक्ष्मीच्या समोरच गळफास गळ्यास अडकविला आणि गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पण असे करतांना तिला खरचं गळफास बसला आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बामणी पोलीस ठाण्याचे सपोनि कृष्णा घायवट यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह धाव घेतली. तसेच, पंचनामा केला. यानंतर मृत सायलीच्या आई-वडिलांच्या जबाबावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!