Navi Mumbai Crime

Navi Mumbai Crime : आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्याला अटक; नवी मुंबईमधील घटना

645 0

नवी मुंबई : पनवेल शहरामध्ये अल्पवयीन मुलीला धमकी देऊन (Navi Mumbai Crime) तिच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलीला व तिच्या कुटुंबियाला धमकावून 50 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या खंडणीखोरास पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी मागणाऱ्या व्यक्तीने 13 वर्षीय मुलीसोबत स्नॅपचॅटवर ओळख केली. त्यानंतर तिचे आक्षेपार्ह फोटो मिळवले. मुलीचे हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो पैशाची मागणी (Navi Mumbai Crime) करत होता.

Nashik Accident : आई वडील पंढरपूरच्या वारीला गेले असताना लेकाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पनवेल परिसरात राहणाऱ्या 13 वर्षीय मुलीसोबत सदर प्रकार घडला आहे.सदर मुलीची स्नॅपचॅटवर सिराज अहमद आबीद अली चौधरी (वय 19) या तरुणासोबत ओळख झाली. यानंतर त्याने अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादित करून तिचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओ मिळवले. याच फोटोंच्या आधारे आरोपी मुलीला धमकावत होता. याआधी तो पनवेलला येऊन मुलीला भेटून देखील गेला. यावेळी देखील त्याने तिच्यासोबत फोटो काढले होते. त्यानंतर त्याने सदर मुलीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्या कुटुंबीयांकडे 50 हजाराची मागणी केली होती.

Accident : जुन्या मुंबई महामार्गावर पीकअप कंटेनरमध्ये भीषण अपघात; 1 ठार तर 2 जखमी

सदर प्रकारामुळे भयभीत झालेल्या मुलीच्या पालकांनी पनवेल पोलिसांकडे सदर घटनेची तक्रार केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पनवेल पोलिसांनी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने सिराजची माहिती मिळवत त्याला नाशिक येथून अटक (Navi Mumbai Crime) केली आहे. आरोपी सिराज हा गॅरेज कामगार असून, त्याच्यावर बालकांच्या लैंगिक शोषणासह ऍट्रॉसिटी कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारे त्याने इतरही मुलींना ब्लॅकमेल केले आहे का? याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!