Palghar Crime News

Palghar Crime News : आपल्या मुलीकडे एवढे पैसे कुठून येतात? आई-वडिलांना पडायचा प्रश्न; शाळेत गेल्यावर धक्कादायक माहिती आली समोर

828 0

पालघर : पालघरमध्ये (Palghar Crime News) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये जेवण बनवण्याचं काम करणाऱ्या नराधमाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना वसई परिसरात घडली आहे. या प्रकरणी आरोपी नराधमाला वालीव पोलिसांनी अटक केली असून राजाराम मौर्य (वय 53) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
वसई पूर्वेस गावराई पाडा येथे संत लीला शाह हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज असून या शाळेत आरोपी राजाराम मौर्य हा जेवण बनवण्याचे काम करतो. या शाळेत इयत्ता चौथीत पिडीत अल्पवयीन मुलगी शिकत असून 53 वर्षाचा आरोपी राजाराम मौर्य याने या शाळेत शिकणाऱ्या 9 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला पैशांचे आमिष दाखवून तिच्याशी लैंगिक चाळे करायचा. आरोपी गेल्या अनेक दिवसापासून पिडीत मुलीला पैसे देत होता. आपल्या मुलीकडे दररोज पैसे कुठून येतात? तिला कोण पैसे देत आहे? आणि कशासाठी पैसे देत आहे? याची चौकशी करण्यासाठी पीडित मुलीचे पालक शाळेत आले असता अल्पवयीन मुलीला पैसे आणि खाऊ देऊन आरोपी लैंगिक चाळे करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

यानंतर पिडीत मुलीच्या पालकांनी आणि नागरिकांनी शाळा परिसरात आरोपीला पकडून चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला मारहाण करणाऱ्या नागरिकांच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी राजाराम मौर्य याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!