Palghar News

Palghar News : धक्कादायक! क्रिकेट सामना बघताना वाद झाला अन् तरुण जीवानिशी मुकला

547 0

पालघर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना बघताना झालेल्या वादामुळे एका तरुणाला आपला जीव (Palghar News) गमवावा लागला आहे. बोईसर परिसरामध्ये ही मारहाणीची घटना घडली आहे. प्रवीण राठोड (वय 37) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. यामध्ये मारहाण करणारे आरोपी फरार झाले आहेत. या मारहाणीप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
पालघर तालुक्यातील बोईसर येथील चित्रालय परिसरात संतोष हेअर सलून हे दुकान आहे. 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सुरू असताना प्रवीण राठोड (वय 37) आणि आरोपी मनोज गिरी व प्रतिक गिरी हे दोघेजण सलूनमध्ये केस कापण्यासाठी आले होते. विश्वचषक क्रिकेट सामना मोबाईलवर पाहत असताना अचानक प्रवीण राठोड व इतर दोघांमध्ये वाद झाला.

यानंतर हा वाद वाढल्याने त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. याच दरम्यान आरोपींनी आपल्या मित्रांना बोलवून सलूनमधील खुर्चीचे हेडरेस्ट काढून प्रवीण राठोड याच्यावर वार केले. या मारहाणीत प्रवीण राठोड याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रवीणचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. बोईसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार आरोपी मनोज गिरी, प्रतीक गिरी आणि दोन अनोळखी इसमांविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोईसर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shocking News : धक्कादायक ! खोकल्याचे औषध घेतल्याने 5 जणांचा मृत्यू

World AIDS Day : दरवर्षी 1 डिसेंबरलाच का असतो जागतिक एड्स दिन?

Satara News : इन्स्टाग्रामवरची खुन्नस रस्त्यावर निघाली; डॉल्बी स्पर्धेत बंदुका, तलवारी नाचवून तरुणांची हुल्लडबाजी

Datta Dalvi : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना जामीन मंजूर

Ajit Pawar : लोकसभेच्या ‘या’ जागा लढवणार; कर्जतच्या शिबिरात अजितदादांचं मोठं वक्तव्य

Ajit Pawar : ‘सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाले’ अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Supriya Sule : बारामतीत अजित पवार उमेदवार देण्याच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!