crime

Crime News : फोन चार्जला लावणं पडलं महागात, 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू

10599 0

सध्या एक धक्कादायक (Crime News) घटना समोर आली आहे. यामध्ये (Crime News) स्मार्टफोन वापरणे एका गर्भवती महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. ब्राझीलमधील कॅम्पिना ग्रँड येथे राहणाऱ्या जेनिफर कॅरोलिन नावाच्या 17 वर्षीय गर्भवती महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, या घटनेत जेनिफरच्या गर्भातील मूलाचाही मृत्यू झाला आहे.

जेनिफरच्या पतीने सांगितले की, जेनिफर अंघोळ करून आली होती आणि तिने एक्सटेंशन कॉर्डच्या माध्यमाने फोन चार्ज करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक शॉक लागून तिचा मृत्यू झाला. तिच्या पतीने रूममध्ये प्रवेश केला, तेव्हा ती जमीनीवर पडलेली होती. यानंतर, मोबाइल इमरजन्सी केअर सर्व्हिसची (एसएएमयू) टीम त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर, त्यांनी तिच्या मृत्यूची पुष्टी केली.

Share This News
error: Content is protected !!