pune crime

पुण्यात फेरीवाल्यांची अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याला अन् कर्मचाऱ्याला मारहाण

854 0

पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील ढोले पाटील रोडवर (Dhole Patil Road) अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्याला मारहाण (beating) फेरीवाल्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना ही मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये अतिक्रमण निरीक्षक आणि सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. पुण्यातील ढोले पाटील रोडवर ही मारहाणीची घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
सध्या अनाधिकृत फेरीवाल्यांवर पुण्यात कारवाई सुरू आहे. यादरम्यान क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत अतिक्रमण (Encroachment) काढण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला जमावाने मारहाण केली आहे. पुण्यातील ढोले पाटील रोडवर ही मारहाणीची घटना घडली आहे. या कारवाईदरम्यान फेरीवाले, छोटी दुकानवाले सुरक्षारक्षकावर धावून गेले आणि त्यांना धक्काबुक्की केली. या मारहाणीप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!