Khalistani Terrorist

Khalistani Terrorist : NIA कडून 19 खलिस्तानी दहशतवाद्यांची नवी यादी जाहीर

1112 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खलिस्तानी दहशतवाद्यांच्या (Khalistani Terrorist) हत्या प्रकरणावरून भारत व कॅनडामधील संबंध बिघडले असताना आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली आहे. एनआयएने पंजाबमधील विविध शहरे आणि ठिकाणी असलेल्या ‘शीख फॉर जस्टिस’ या भारतातील प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याची संपत्ती जप्त केली असून 19 दहशतवाद्यांची नवी यादी जाहीर केली आहे. या 19 जणांमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे चला पाहूया…

1.परमजीत सिंग पम्मा- ब्रिटन
2.वाधवा सिंग बब्बर- पाकिस्तान
3.कुलवंत सिंग मुथरा- ब्रिटन
4. जेएस धालीवाल- अमेरिका
5.सुखपाल सिंग- ब्रिटन
6.हरप्रीत सिंग उर्फ ​​राणा सिंग- अमेरिका
7.सरबजीत सिंग बेन्नूर- ब्रिटन
8.कुलवंत सिंग उर्फ ​​कांता- ब्रिटन
9.हरजाप सिंग उर्फ ​​जप्पी सिंग- अमेरिका
10.रणजित सिंग नीता- पाकिस्तान
11.गुरमीत सिंग उर्फ ​​बग्गा बाबा- कॅनडा
12.गुरप्रीत सिंग उर्फ ​​बागी- ब्रिटन
13.जस्मीत सिंग हकीमजादा- दुबई
14.गुरजंत सिंग ढिल्लन- ऑस्ट्रेलिया
15. लखबीर सिंग रोडे- कॅनडा
16.अमरदीप सिंग पूरवाल- अमेरिका
17.जतिंदर सिंग ग्रेवाल- कॅनडा
18.दुपिंदर जीत- ब्रिटन
19.एस. हिम्मत सिंग – अमेरिका

यातील गुरुपतवंत सिंग पन्नू याची संपत्ती एनआयएने जप्त केली आहे. तर बाकीच्यांची मालमत्ता लवकरच जप्त केली जाणार आहे.

Share This News
error: Content is protected !!