NIA

NIA : महाराष्ट्रासह NIA ची ‘या’ 4 राज्यात छापेमारी

713 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा एनआयएकडून छापेमारी करण्यात आली आहे. दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) एनआयएकडून शनिवारी कोल्हापूर शहरासह इचलकरंजी आणि हुपरी या ठिकाणी छापेमारी करून 3 जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून काही महत्त्वाची कागदपत्रे, लोखंडी शस्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने कोल्हापूर आणि नाशिकसह देशात पाच राज्यातील 14 ठिकाणी छापे टाकले आहेत.

अत्यंत गोपनीयरित्या कारवाई
एनआयएच्या पथकांनी शनिवारी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील 14 ठिकाणे छापे टाकले. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि नाशिक येथे टाकलेल्या छाप्यांमधून काही महत्त्वाची माहिती पथकांच्या लागली आहे. यात संशयास्पद कागदपत्रे, लोखंडी शस्त्रे यासह मोबाइल, लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून तीन संशयितांना पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांनाही याची कल्पना दिली नाही. कारवाई करून पथके परतल्यानंतरच याची माहिती एनआयएने जाहीर केली.

तपास यंत्रनेने कोल्हापूरात कारवाई केल्या नंतर महालक्ष्मी मंदिरतील सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. संशयितांकडे मिळालेल्या कागदपत्रांमधून धक्कादायक माहिती एनआयएच्या हाती लागली. या कागदपत्रांनुसार पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय ही दहशतवादी संघटना 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा अजेंडा घेऊन काम करीत आहे.

Share This News
error: Content is protected !!