Cyber Crime

Cyber Crime : घरबसल्या पैसे कमवून झटपट श्रीमंत व्हा; सायबर चोरांचा नवीन फंडा आला समोर

424 0

पुणे : गेल्या काही दिवसांपासून (Cyber Crime) वर्क फ्रॉम होम करुन पैसे कमवा, यू ट्युब व्हिडिओ लाईक करुन मालामाल व्हा, ऑनलाईन व्यवसाय सुरु करा लाखो कमवा, घरबसल्या कमाई करा असे कॉल तुम्हालाही आले असतील. आणि जर तुम्ही या लोकांच्या भूलथापांना भुलला तर तुम्ही स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेताल. कारण हे फ्रॉड कॉल करणारे भामटे तुमची आर्थिक फसवणूक करू शकतात.

सायबर गुन्हेगारांचा काय आहे नवीन फंडा?
सायबर गुन्हेगारांनी आता चोरीचा नवा फंडा शोधून काढला आहे. घरबसल्या पैसे देण्याचं आमिष दाखवत गुन्हेगार तुम्हाला लुटतायत. तंत्रज्ञान जसं बदललं तसं गुन्हेगारीचं स्वरुपही बदललं आहे.मुंबई पोलीसमधून बोलतोय, कुरिअरमध्ये ड्रग्स सापडलंय, पैसे पाठवा नाहीतर कारवाई करु, एटीएम कार्ड बदलायचं आहे, लिंकवर क्लिक करा.वीजबील न भरल्याने वीज तोडण्यापासून वाचण्यासाठी लिंकवर दिलेल्या वेबसाईटवर माहिती भरा. क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एकट्या पुण्यात गेल्या आठ महिन्यात एक हजारपेक्षा जास्त सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकरणांची आकडेवारी
टास्क फ्रॉडची 209 प्रकरणे
मनी ट्रान्स्फरची 56 प्रकरणे
KYC अपडेट करा या गुन्ह्यांचे 42
क्रीप्टोकरन्सीत गुंतवणूक करुन फसवणुकीचे 58
इन्शुरन्स फसवणुकीचे 10
घरबसल्या कमाईच्या फसवणुकीचे 31
शेअर मार्केट फ्रॉडचे 27
कर्ज देणार सांगून फसवणुकीचे 29
ऑनलाईन विक्री-खरेदीत फसवणुकीच 62
फेक प्रोफाईलचे 85
फेसबुक हॅकिंगचे 34
सेक्सटॉर्शनचे 35
एकूण 1 हजार 114 तक्रारी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!