Mumbai Crime News

Mumbai Crime News : दारु देण्यास नकार दिल्याने ग्राहकाने थेट पिस्तुलच काढलं; मुंबईमधील पबमध्ये जोरदार राडा

623 0

नवी मुंबई : नवी मुंबईत (Mumbai Crime News) एपीएमसी इथं असलेल्या सेवन स्काय पबमध्ये काही ग्राहकांनी राडा घातल्याची घटना समोर आली आहे. दारू द्यायला नकार दिल्यानं ग्राहकाने थेट पिस्तुलच बाहेर काढल्यामुळे जोरदार राडा झाला आहे. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नवी मुंबईतल्या एपीएमसी इथं सेवन स्काय पबमध्ये दारू द्यायला नकार दिल्यानंतर ग्राहकांनी जोरदार गोंधळ घातला. थेट पिस्तुल काढून धिंगाणा घातला. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. दारूची मागणी करत ग्राहकांनी खुर्च्यांचीदेखील तोडफोड केली. दरम्यान, सेवन स्काय पबवर याआधी उशिरा सुरू असल्याने अनेकदा कारवाईदेखील करण्यात आली आहे.

मालकाचा वाढदिवस साजरा करायचा असल्याचं म्हणत आरोपी आले. त्यांनी दारुची मागणी करताच नकार दिला गेल्याने ते संतापले. त्यानंतर एका ग्राहकाने थेट पिस्तुल काढले. यावेळी खुर्च्यांची तोडफोड केली गेली. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!