Nashik Bribe News

Nashik Bribe News : 15 लाखांची लाच घेताना नाशिकच्या तहसीलदाराला ACB कडून अटक

987 0

नाशिक : नाशिकमध्ये लाच घेताना (Nashik Bribe News) नाशिकचे तहसीलदार नरेश कुमार बहिरम (रा. फ्लॅट नंबर -604, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक ) यांना ACB कडून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे महसूल विभागात (Nashik Bribe News)  एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील एका जमिनीतून मुरूम उत्खननाचे प्रकरण समोर आले होते. त्याबाबत नियमानुसार पाचपट दंड आणि जागा मालकास जागा भाडे असे मिळून एकूण 1 कोटी 25 लाख 6 हजार 220 रुपये इतका दंड ठोठवण्यात आला होता. मात्र, या आदेशाविरुद्ध जमीन मालकाने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चौकशीसाठी तहसीलदार बहिरम यांच्याकडे पाठवण्यात आले होते. याबाबत जागेची पडताळणी करण्यासाठी तहसीलदार नरेशकुमार बहिरम हे राजुर बाहुला येथील तक्रारदारांच्या जमिनीवर गेले. त्या ठिकाणी त्यांनी या प्रकरणी तडजोड करण्यासाठी व त्यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी 15 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

यानंतर 52 वर्षीय तक्रारदारानी लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाची शहानिशा करून लाचलुचपत विभागाने सापळा रचत तहसीलदार नरेश कुमार बहिरम यांना शहरातील कर्मयोगी नगर येथील त्यांच्या मेरिडियन गोल्ड येथील बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!