Nashik Crime

Nashik Crime : पोराच्या ‘त्या’ त्रासाला वैतागून जन्मदात्या बापानेच रचला हत्येचा प्लॅन अन्…

1123 0

नाशिक : नाशिकमधील (Nashik Crime) सिन्नर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पास्ते शिवारातील बंद पडलेल्या स्फोटक कंपनीच्या मीटर हाऊसमध्ये एक मृतदेह आढळून आला होता. याबाबत सिन्नर पोलिसांना तपास सुरू केला असता एक धक्कादायक माहिती समोर आली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
यामध्ये दारू पिऊन सतत त्रास देत असल्याने मुलाला जन्मदात्या बापानेच 70 हजार रुपयांची सुपारी देऊन संपवले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मयत तरुणाच्या वडिलांसह आणखी दोघांना अटक केली आहे. राहुल शिवाजी आव्हाड (30) असे मृत तरुणाचे नाव आहे. मयताचे वडील शिवाजी आव्हाड यांनी गावातीलच वसंता अंबादास आव्हाड (वय 40) व विकास उर्फ बबलू शिवाजी कुटे (वय 42) या दोघांना राहुलला ठार मारण्याची सुपारी दिली होती. यातील 20 हजार ऑनलाईन देण्यात आले तर 50 हजार रुपये रोख देण्यात आली होती.

कशाप्रकारे केला खून?
वसंत आव्हाड याने दारू पिण्याच्या बहाण्याने राहुलला बंद पडलेल्या कंपनीकडे नेले. तेथे विकास देखील होता. तिघांनी मद्यपान केल्यावर कमरेच्या पट्ट्याने गळा आवळून राहुलचा खून केला व दोघेही तिथून पळून गेले. वडील शिवाजी आव्हाड यांनीच मुलाच्या खुनाची कबुली दिल्यावर सिन्नर पोलिसांनी तिघांना अटक केली. जन्मदात्या बापाने पोटच्या गोळ्याचा अशाप्रकारे खून केल्याने गावात खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!