Nashik News

Nashik News: नाशिकमधील अंबड रोडवर दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला; दोघांंचा मृत्यू

586 0

नाशिक : सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक (Nashik News) अशीच एक गुन्हेगारीची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नाशिक (Nashik News) हादरलं आहे. यामध्ये दहा ते बारा जणांनी धारदार शस्त्राने दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला केला. यात दोघांचा मृत्यू झाला. मेराज खान (18 वर्षे) असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर इब्राईम शेख या तरुणावर नाशिक जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा देखील मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

नाशिकच्या अंबड लिंक रोडवर गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास संजीवनगर परिसरातील शिवनेरी चौकात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने दोन युवकांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात मेराज खान या 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर इब्राईम शेखवर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले होते.

परिसरात तणावाचे वातावरण
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा रुग्णालयात उपचारात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रात्री मृत मेरजला रुग्णवाहिकेतून थेट पोलीस आयुक्त कार्यालयात घेऊन गेले होते. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत घालताच पुन्हा रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयाकडे वळवण्यात आली. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!