Nashik News

Nashik News : नजर हटी दुर्घटना घटी ! नाशिकमध्ये दोन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत

4649 0

नाशिक : अनेकवेळा आपल्या चुकीमुळे किती मोठा अनर्थ घडू शकतो याचा प्रत्यय नाशिकमध्ये (Nashik News) आला आहे. नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये घरात खेळत असताना अंगावर उकळते पाणी पडल्याने गंभीर भाजलेल्या दोनवर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जयश्री तुकाराम सिद (वय 2 वर्ष,रा. कुशेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक) असे दुर्दैवी मृत्यू पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे.

काय घडले नेमके?
जयश्री ही दि. 30 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरात खेळत होती. त्यावेळी घरातील चुलीवर असलेले उकळते पाणी तिच्या अंगावर पडले. यात ती गंभीर भाजल्याने तिला तातडीने वाडीव-हे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानतंर तिला तेथू जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले तिथे तिच्यावर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान मंगळवारी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दोन वर्षाच्या चिमुकलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने इगतपुरी तालुक्यातील सिद कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून गावावर सर्वत्र शोककळा पसरली असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबीयांची एक चूक किती महागात पडू शकते याचा प्रत्यय या प्रकरणातून तुम्हाला आला असेल. याबाबत वाडीव-हे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!