Nashik Accident

Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात ! ‘या’ माजी भाजपा नगरसेवकासह 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

717 0

नाशिक : नाशिकच्या (Nashik Accident) चांदवडमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चांदवडमध्ये कार-कंटेनरमध्ये जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि, यामध्ये कारचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. मृतांमध्ये धुळ्याचे भाजपाचे माजी नगरसेवक किरण अहिरराव यांचा समावेश आहे.

कसा घडला अपघात?
चांदवड येथील नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर वडणेरभैरव पोलीस, सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्त पथक घटनास्थळी पोहचले होते. या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता. अपघातातील सर्व मृत हे धुळे जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. चौघेही जण नाशिककडून धुळे येथे चालले होते. मृतांमध्ये धुळ्याचे भाजपाचे माजी नगरसेवक किरण अहिरराव यांचा समावेश आहे.

किरण हरीचंद्र अहिराव, अनिल विष्णू पाटील, कृष्णकांत चिंधा माळी, प्रवीण मधुकर पवार अशी या अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांनी चौघांचेही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणले आहेत. या अपघातानंतर पोलिसांनी आरोपी कंटेनरचालकाला ताब्यात घेतले आहे.

Share This News
error: Content is protected !!