Nashik Accident

Nashik Accident : शाळेत जाताना घात झाला; आजोबांसह 2 नातींनी गमावला जीव

598 0

नाशिक : नाशिकमधून (Nashik Accident) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गवरील मालेगावच्या मुंगसे गावाजवळ राज्य परिवहन मंडळाच्या बसने मोटार सायकलला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एक वृद्ध आजोबा आणि त्यांच्या दोन नातींचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातानंतर त्या ठिकाणी संतप्त वातावरण निर्माण झाले होते. तसेच गावकऱ्यांनी अपघातानंतर काही काळ रास्ता रोकोदेखील केला होता.

काय घडले नेमके?
आजोबा त्यांच्या दोन्ही नातींनी घेऊन शाळेत निघाले होते.आज शाळेत शेवटचा पेपर होता. शाळेत जात असतानाच बसने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघात इतका भीषण होता की आजोबा आणि त्यांची एक नात जागीच ठार झाले. तर दुसरी नात गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात मात्र तिनेदेखील आजोबा आणि आपल्या बहिणीपाठोपाठ उपचारादरम्यान आपला जीव सोडला.

आजोबांसह नातीचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरातून एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घरातील तीन सदस्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!