Nanded News

Nanded News : शेतात काम करताना घडली मोठी दुर्घटना; बायकोच्या डोळ्यांदेखत नवऱ्याचा तडफडून मृत्यू

9362 0

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाचा शेतात काम करताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्या बायकोच्या डोळ्यांदेखत त्याचा तडफडून मृत्यू झाला आहे.

काय घडले नेमके?
शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात विजांच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली. नांदेड शहरासह किनवट, हिमायतगर, भोकर, हदगाव, मुखेड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. किनवट तालुक्यातील बोधडी नागसवाडी येथील साईनाथ दत्ता घुगे आणि त्यांची वैष्णवी घुगे हे दोघे शुक्रवारी दुपारी शेतात गेले होते. शेतातील कामे करत असताना अचानक पाऊस सुरु झाला.

यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी जातं झोपडीकडे असताना त्यांच्यावर त्यांच्या वीज कोसळली. यात साईनाथ घुगे या 25 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी वैष्णवी घुगे ह्या जखमी झाल्या. त्यांच्यावर गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेमुळे घुगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share This News
error: Content is protected !!